श्रीमंतांची अधिक श्रीमंती आणि गरिबांची अधिक गरिबी
कुठल्याही देशाच्या एकूण संपत्तीपैकी जास्तीत जास्त ३० टक्के संपत्ती अतिश्रीमंत लोकांकडे असणे धोकादायक असले, तरी आजकाल ते सर्वमान्य होऊ लागले आहे. हे प्रमाण त्याहून अधिक वाढले, तर अशा देशात सशक्त आणि परिणामकारक भूमिका बजावणारा मध्यमवर्ग निर्माण होऊ शकत नाही. सर्वांत कमी प्रमाणात आर्थिक विषमता असलेला श्रीमंत देश जपान हा आहे. तिथे अतिश्रीमंतांकडील संपत्तीचे प्रमाण अवघे २२ टक्के आहे.......